You are currently viewing सफर कृष्णविवराची

सफर कृष्णविवराची

Imagination will often carry us to worlds that never were, but without it we go nowhere.

― Carl Sagan

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी ‘कॉन्टॅक्ट’ नावाची एक कादंबरी लिहीली होती. या कादंबरीवर आधारीत १९९७ साली चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या कांदबरीमध्ये मुख्य नायिका एलनॉर ही कृष्णविवरात उडी घेते, असा प्रसंग आहे. यानंतर ती त्यात असलेल्या कृमीविवराच्या (वर्म होल) साहाय्याने २६ प्रकाशवर्ष दुर असलेल्या अभिजित ताऱ्याजवळ जाऊन पोहोचते. अभिजितजवळ असलेल्या ग्रहांपैकी एका ग्रहावर तिला पृथ्वीवर मृत झालेले तिचे पिता भेटतात. याचा अर्थ असा की या साऱ्या प्रवासात ती वर्तमानातुन भुतकाळात प्रवेश करते. या प्रवासाला वैज्ञानिक भाषेत टाइम ट्रॅव्हल (कालप्रवास) असे म्हणतात. आता कृष्णविवर आणि कृमीविवरात जाता येते का? हा प्रश्न उद्भवतो. कारण कृमीविवराच्या साहाय्याने आपण एका आकाशगंगेतुन दुसऱ्या आकाशगंगेत पोहोचु शकतो. महान वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांतामध्ये ‘आईनस्टाईन-रोझेन ब्रिज’ नावाची एक संकल्पना मांडण्यात आली आहे.

 सापेक्षता सिद्धांतातील आईनस्टाईन-रोझेन ब्रिज’ संकल्पना

कृमीविवर तयार झाल्यानंतर लवकरच कोलमडुन पडते, असे ही संकल्पना सांगते. सापेक्षता सिद्घांतामध्येच संकल्पनेद्वारे प्रत्यक्ष सिद्ध करण्यात आलं आहे की आपण कृष्णविवरात कींवा कृमीविवरात जाऊ शकतो. कारण कोणतीही वस्तु कृष्णविवराच्या मर्यादित अतंरावर आल्यानंतर तो स्व:त सारं आपल्या आत सामावुन घेतो. सापेक्षतेमधील कृष्णविवर ही संकल्पना खरी ठरली मात्र श्वेतविवर (व्हाईट होल) आणि कृमीविवर अजुनही सैद्धांतिक कल्पना आहेत.

आता हाच प्रसंग इंटरस्टेलार या सायन्स फीक्शन चित्रपटात दाखवण्यात आला आहे. एका मर्यादित अतंरावर आल्यानंतर कुपर स्व:तला टार्ससह कृष्णविवरात झोकुन देतो. आता प्रश्न येतो की तो जिवंत कसा? किंवा इतक्या अफाट गुरूत्वाकर्षणामुळे त्याचे तुकडे का झाले नाहीत? कारण कृष्णविवर एक अशी गोष्ट आहे जिथे भौतिकशास्त्राचा एकही नियम कार्य करु शकत नाही. याचं गुरूत्वीय बल फारच शक्तिशाली असतं. जर आपण प्रकाशाच्या वेगाने म्हणजेच ३ लाख कीमी/प्रतिसेकंद असा प्रवास केला तरच त्या भयाण काळोखात तग धरु शकतो, मात्र प्रत्येक वेळेस नाही. कारण आईनस्टाईन यांच्या मते विश्वात प्रकाशापेक्षा जास्त वेगाने कोणतीही वस्तु प्रवास करु शकत नाही. मात्र हा नियम कृष्णविवराच्या आत लागु होत नाही, कारण तो प्रकाशालाही गिळंकृत करुन टाकतो.

सर्वप्रथम हे जाणुन घ्यायला हवं की गुरुत्वाकर्षण हे अंतराळ आणि वेळेला (Space & Time) वाकवु शकतो कींवा बेंड करु शकतो. शास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग यांच्या ‘हॉकींग रेडीएशन’नुसार कृष्णविवरात गेल्यानंतर दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे तुम्ही काही क्षणांमध्येच जळुन खाक व्हाल कींवा तुम्हाला कोणतही नुकसान होणार नाही मात्र तुम्ही कृष्ण विवरात कायमचे अडकुन पडाल (यावेळी तुमचे सारे शरीर सुन्न पडेल). आजपर्यंत कोणी हे सिद्ध करु शकलं नाही की कृष्ण विवराच्या साहाय्याने आपण थेट दुसऱ्या ब्रम्हांडात कींवा दुसऱ्या रहस्यमयी जगात पोहोचु शकतो, मात्र वैज्ञानिकांनी मांडलेले अनेक सिद्धांत याच प्रतिक्षेत आहेत. कृष्ण विवराच्या बाहेरच्या कडीला इव्हेंट होरायझन (घटना क्षितीज) असे म्हणतात. एखादा महाकाय तारा सुपरनोव्हाद्वारे मरण पावल्यानंतर त्याचे कृष्णविवरात रुपांतर होते. यानंतर तो स्वत:च्या गुरूत्वाकर्षणामुळेच लहान होऊन पुर्णपणे अदृष्य होऊन जातो. यावेळी त्याच्या केंद्रस्थानी एक अदृष्यरुपी बिंदु तयार होतो ज्याला ‘सिंग्युलॅरीटी’ म्हणतात. ही एक अशी गोष्ट आहे जिथे भौतिकशास्त्राचे सर्वच नियम फोल ठरतात. याच सिंग्युलॅरीटीच्या चारही बाजुंनी एक कुंपण तयार होतं ज्याला ‘घटना क्षितीज’ म्हणतात. पुंज गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे या घटना क्षितीजाच्या कडीवरील तप्त कण तुटून ब्रंम्हांडात मिसळत असतात.

आता एक उदाहरण घ्या, तुम्ही कृष्ण विवराच्या जवळ तुमच्या साथीदारासह प्रवास करत आहात. तुम्ही त्याचा साथ सोडुन कृष्णविवराच्या आत झेपावता. तुम्ही जेव्हा इव्हेंट होरायझनजवळ पोहोचता तेव्हा तुमच्या साथिदाराला तुम्ही एका भिंगातुन एखादी वस्तु पाहील्यावर जशी दिसते तसे भासता. तसेच त्याला तुम्ही स्लो मोशनमध्ये कृष्णविवरात पडताना भासता आणि पुर्णपणे लाल होऊन नंतर अदृश्य होऊन जाता. या सर्व गोष्टी सैद्धांतिक असल्या तरी त्या खोट्या आहेत असे आपण ठरवु शकत नाही. दुसरं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण कृष्णविवरात पडतो तेव्हा घटना क्षितीजावरील प्रकाश आपल्याला वळलेल्या आकृतीसारखा (Distorted) भासतो ज्याला ‘The Photon Sphere’ म्हणतात. यामध्ये प्रवेश केल्यानंतर बाहेरुन येणारा प्रकाश आपल्याला गोल स्वरुपात हळुहळु दुर जाताना भासेल आणि अदृष्य होईल. काही वेळानंतर गुरूत्वाकर्षण इतकं भयंकर शक्तिशाली होईल की आपल्या शरीराच्या खालच्या भागातील गुरूत्वाकर्षण हे डोक्यावरील गुरूत्वाकर्षणापेक्षा कोटीच्या कोटी पटीने जास्त असेल. यामुळे आपल्या शरीरातील सारे अणु (Atom) अतिशय वेगाने खेचले जातील तसेच सर्व कणांचे (Particles) एका सरळ लांब रेषेत रुपांतर होईल. यावेळी आपलं शरीर एका स्फागेटीप्रमाणे होईल. याला वैज्ञानिक भाषेत ‘स्फागेटीफीकेशन’ असं म्हणतात. सिंग्युलॅरीटीकडे पोहोचेपर्यंत आपण अशाच स्वरुपात आणि लांबलचक असु.

spaghettification

माणुस कृष्णविवरात जिवंत राहु शकत नाही, हे कोणीही स्पष्ट करु शकलं नाही. मात्र तरीही वैज्ञानिकांनी मांडलेल्या सिद्घांताच्या आधारे याचा छडा भविष्यातली पिढी नक्कीच लावेल अशी आशा आहे. कादंबरी ही काल्पनिक असते त्यामुळे आपण कल्पनेच्या साहाय्याने ब्रम्हांडात काहीही करु शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट मर्यादित असते. या मर्यादेचं पालन करुनच लेखक किंवा वैज्ञानिक तसे प्रसंग मांडतो. इंटरस्टेलारमध्ये असे दाखवण्यात आले आहे की एक रहस्यमयी सभ्यतेने (परग्रही कींवा मानवी प्रगत सभ्यता) शनि ग्रहाच्या जवळ कृमीविवर तयार केला किंवा पोहोचवला आहे. याच कृमिविवराच्या साहाय्याने ते गॅरगँटुआ नावाच्या कृष्णविवरापर्यंत पोहोचतात. आता जर ती सभ्यता मानवाला मदत करु इच्छित होती तर कुपरच्या अनेक साथिदारांचा मृत्यु का झाला? तर याच उत्तर एकच! परमेश्वर आपल्याला केवळ मार्ग दाखवतो मात्र त्या मार्गावर आपल्यालाच चालायचंय. अशा प्रमाणे तो कृमिविवर आणि कृष्णविवर तिथपर्यंत या प्रगत सभ्यतेनेच आणला असतो, मात्र त्याच्या पाचव्या परिमाणात (5th Dimension) पोहोचण्याची जबाबदारी माणसाचीच होती. म्हणुनच कुपरचा त्या कृष्णविवरात मृत्यु होत नाही आणि तो पाचव्या परिमाणात पोहोचतो. सांगण्याचं तात्पर्य एकच की कार्ल सेगन यांच्यासारखा महान वैज्ञानिक मनुष्याला कृष्णविवरात झोकुन देण्याचा प्रसंग लिहु शकतो तर एखादा चित्रपट दिग्दर्शक का नाही? कारण कीप थॉर्न या नोबेल पारीतोषिक जिंकलेल्या भौतिक शास्त्रज्ञाच्या मदतीच्या आधारे हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपट असल्यामुळे थोडीफार सिनेमॅटीक लिबर्टी घेणं साहजिक आहे. मात्र वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले चित्रपटांची जगाला फारच गरज आहे. कृष्ण विवर ही ब्रम्हांडातील सर्वात सुंदर आणि तितकचं भयाण खगोलीय गोष्ट आहे. आजवर मानवाने केवळ त्याच्याबद्दल सिद्धांतांद्वारे आपापली मते मांडली. गेल्या वर्षी एम-८७ या दिर्घिकेतील खऱ्याखुऱ्या कृष्णविवराचं छायाचित्र जगासमोर आलं. आपण या कृष्णविवराचं रहस्य कधी उलगडणार याची उत्सुकता लागुन आहे.

मेसिअर-८७ या दिर्घिकेतील ‘पोवेही’ या कृष्णविवराचं छायाचित्र

Test ideas by experiment and observation. Build on those ideas that pass the test, reject the ones that fail. Follow the evidence where ever it leads, and question everything. Accept these terms, and the cosmos is yours.

Neil deGrasse Tyson

माणुस म्हणुन जन्माला आल्यानंतर आपल्याला खुप प्रश्न पडतात, खरंतर हे प्रश्न पडणं महत्त्वाचं आहे. नानाविध प्रश्न पडायला सुरुवात झाली कि, उत्तरं शोधण्याच्या तयारीला माणुस आपोआपच लागतो.

शब्दसूची

Black Hole – कृष्ण विवर
Worm Hole – कृमी विवर
Vega Star – अभिजित तारा
Time Travel – कालप्रवास
Theory of Relativity – सापेक्षता सिद्धांत
White Hole – श्वेत विवर
Gravitational Force – गुरुत्वीय बल
Quantum Gravity – पुंज गुरुत्वाकर्षण
Event Horizon – घटना क्षितीज
Singularity – कृष्ण विवराचं केंद्रस्थान
5th Dimension – पाचवं परिमाण
Gargantua – इंटरस्टेलार चित्रपटातील कृष्ण विवराचं नाव
The Photon Sphere – फोटॉनच्या कणांनी तयार झालेला गोल

लेखनसीमा !


लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

3
Please leave a feedback on thisx


ALSO READ___


TAGS_____

#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters


आर्टिकल शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Pooja Patil
Pooja Patil
3 years ago

🙌🏻🙌🏻nice information brother 👏🏻

Swanand Patwardhan
Swanand Patwardhan
3 years ago

I heard that at Mt Kailas we have Blackhole so it is almost impossible to trek over there .Some group of trekkers went there and when they came back their age was increased surprisingly by 10-15 years

Dhanashree
Dhanashree
3 years ago

माहिती 💯😍

Ashwin borse
Ashwin borse
1 year ago

खुप सूंदर